स्वामी भक्त हो !!
श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रम्ह आहेत..कलीयुगात मानवाला तारण्यासाठी हे गुरपरब्रम्ह पृथ्वीवर सगुण रुपात आले.अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " हे अभय वचन दिले आणि श्री स्वामी समर्थ हा सहाअक्षरी महामंत्र मानवास दिला..सर्व ब्रम्हांडाची शक्ती हि ह्या मंत्रात सामावलेली आहे..स्वामी नामस्मरण करून आपणा सर्वांची भक्ती अधिक दृढ व्हावी..स्वामी नामाचा भाव हृदयात सतत जागृत राहावा..आणि आपण पुर्ण परब्रम्हाच्या स्मरणात सतत रहावे ह्या हेतूने आम्हाला निमित्त करून स्वामींनीच हे app तयार करवून घेतले आहे..
** ह्या app अजून एक वैशिष्ट्य असे कि अंतर्मनाच्या नियमांचा अभ्यास करून ह्या app ची design केले आहे..रात्री झोपतांना आणि सकाळी उठतांना अनन्य भाव ठेवून जप केला असता अधिक परिणाम कारक होईल असे आपणास आवर्जून सांगावेसे वाटते. तसेच पुढे हि स्वामी कृपेने ह्या मध्ये खूप छान छान features देण्यास आम्हाला आनंद होणार आहे...ह्या मागे आमचा कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन नाही..आपली स्वामी भक्ती वाढत जात आहे हीच आमच्यासाठी अमुल्य अशी पावती आहे..!! हे app पूर्णपणे स्वामी सेवाभाव समोर ठेवून स्वामीनीच बनवून घेतले आहे..आणि आम्हाला विश्वास आहे कि आपणास हि सेवा नक्की आवडेल.धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद !!!